Ad will apear here
Next
आभाळाच्या भाळावरती


आभाळाच्या भाळावरती
कधी उमटते रेघ रुपेरी
कधी सावळ्या संध्याकाळी
सुवर्णतेजाची झळाळी...

अथांग बिंदूच्या अंताशी
खोल निळाई कधी दाटते
कधी मेघांच्या जडभाराने
आभाळाची आभा आटते...

भाळावरती कधी उमटते
रंगसप्तमी इंद्रधनूची
कधी वाटते पहाटसमयी
हीच पाऊले नव्या मनूची...

मिटता संध्या भाळावरती
खेळ खेळती चंद्रचांदणे
खुललेले आभाळ उधळते
नक्षत्रांचे अमोघ देणे...

- दिनेश गुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RUIYCW
Similar Posts
शब्द शब्दांचीच वाणी शब्दांचीच गाणी तुझ्या माझ्या ओठी रेंगाळती शब्दांमधे भाव हृदयाचा ठाव शब्दांनीच नाते सांधलेले
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
खुळा पाऊस ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’मध्ये आज पाहू या कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर यांची ‘खुळा पाऊस’ ही कविता.
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language